महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला विनंती करुन एमपीएससीचे परीक्षांसंदर्भातील नवे नियम २०२५ पासून लागू होणार आहेत. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.
मुख्यमंत्री श्र शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविलेल्या पत्रात सांगीतलं आहे की राज्य सेवा ही वस्तुनिष्ठ पर्यायांवर आधारित परीक्षा घेतली जाते परंतु त्यामध्ये बदल करुन जुन्या पद्धतीने वर्णनात्मक पद्धतीने परिक्षा घ्यावी असा निर्णय आयोगाने घेतला आहे.
हा निर्णय लगेच, २०२३ पासून लागू त्यामुळे विद्यार्थांना या परिक्षेची तयारी करण्यास वेळ मिळणार नाही यामुळे विद्यार्थांवर अन्याय होण्याची शक्यता असून त्यामुळे वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय पुढे ढकलुन २०२५ ला वर्णनात्मक पद्धतीने परीक्षेचा निर्णय घ्यावा अशी आग्राहाची मागणी विद्यार्थांनी केली आहे. विद्यार्थ्यांची ही मागणी पुर्ण करावी त्याप्रमाणे वर्णनात्मक परीक्षा पद्धतीचा निर्णय पुढे ढकलावी अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे. आयोग यावर लवकरच निर्णय घेऊन राज्यातील विद्यार्थांना दिलासा देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे अत्यंत चांगल्यारित्या कामगीरी करत असुन गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये आयोगाने नोकऱ्यांमधील जागा कमी करण्याचे काम हे वेगाने केले आहे. तसेच शासकीय नोकऱ्यांमधील ७५ हजार रिकाम्या जागा भरण्याची तयारी देखील पुर्ण झाले असुन त्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पत्रात सांगीतले आहे.