Ind vs Eng : कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आलेला
भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेच्या पाचवा सामनाची तारीख ठरली आहे. चौथ्या कसोटीत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यांच्या पाठोपाठ सपोर्ट स्टाफमधील एकेक सदस्य विलगिकरणात गेला होता. पाचव्या कसोटीपूर्वीही सपोर्ट स्टाफमधील सदस्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं ती कसोटी रद्द करण्यात आली होती. भारतीय संघ या मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे, परंतु पाचवा सामना रद्द झाल्यानं मालिकेचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आला नव्हता. आता पाचवी कसोटी होईल आणि त्यानंतरच निकाल ठरणार आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डानं रद्द झालेल्या त्या कसोटी सामन्याची नवीन तारीख आज जाहीर केली आहे.
🚨 JUST IN: The fate of the fifth #ENGvIND Test has been decided.
— ICC (@ICC) October 22, 2021
Details 👇 https://t.co/wHagFc0wUF
त्यानुसार रद्द झालेली पाचवी कसोटी आता १ ते ५ जुलै २०२२मध्ये एडबस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. दरम्यान BCCIचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, भारत-इंग्लंड कसोटी मालिका पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. चार कसोटीत आम्ही २-१ अशी आघाडी घेतली आहे आणि पाचव्या सामन्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.''