शेवटच्या श्वासापर्यंत संविधानात बदल होऊ देणार नाही आ. संदीप क्षीरसागर...!
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती बीडमध्ये बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या जयंतीनिमित्त भीमसैनिकांना संबोधित करताना सांगितले की मी शेवटच्या श्वासापर्यंत संविधानात बदल होऊ देणार नाही यावेळी गायक आदर्श शिंदे यांनी गायलेल्या गाण्यावर आमदार संदीप क्षीरसागर यांनी अनोखा डान्स देखील केला. गेली दहा वर्षापासून बीड शहरात मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि गुरु रविदास महाराज यांची जयंती या चार जयंती बीड शहरात मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जातात यामध्ये संदीप क्षीरसागर यांचा सिंहाचा वाटा असतो. महत्त्वाचं म्हणजे देशात संविधान बदलण्याची भाषा करत असल्याचं अनेक वक्तव्य आपण प्रसारमाध्यमावर पाहिले आहेत यावर आदर्श शिंदे यांनी एक गीत गायले, गीताचे बोल होते...
चला आता उठायची वेळ आली... वैरी उभा झाला पाडा त्याला खाली... जागवा तो स्वाभिमान... उंचवा आपली मान... हीच आहे आन-बान शान... गेला तर जाऊद्या प्राण... पण वाचवा संविधान...!
या गीतावर सर्वच प्रेक्षकांनी टाळांच्या कडकडाटासह अनोखा डान्स देखील केला यावेळी बीड शहरातील नव्हे तर बीड जिल्ह्यातील अनेक तरुण तरुणी अबालवृद्ध या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात हजर होते हा जयंती उत्सव माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी करत राहील व संविधानात कसलाही बदल होऊ देणार नाही असे आश्वासन संदीप क्षीरसागर यांनी दिले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सांगितले की संविधानात बदल होऊ देणार नाही याच्यासाठी मला संसदेत पाठवा असे आश्वासन देखील बजरंग सोनवणे यांनी दिले यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.