पैठणच्या नाथ मंदिरालगत (paithan nath mandir) यात्रा मैदानासाठी आरक्षित असलेल्या क्षेत्रावर नगर परिषदेने बांधलेल्या अनधिकृत व्यापारी संकुलाचे बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी नगर परिषद प्रशासनास दिले होते, त्यानंतर आज संबंधित गाळे जेसीबीद्वारे पाडण्यात आले आहे.
प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील तब्बल 44 गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे व्यापारी संकूल बेकायदेशीर पद्धतीने बांधण्यात आले होते. तसेच पाडण्यात आलेले व्यापारी संकूल एकनाथ महाराज यात्रा मैदानावर उभारण्यात आले होते. त्यामुळे या संकुलाविषयी भाविकांमध्येही तीव्र नाराजी होती.
यापूर्वी सुद्धा अनधिकृत गाळे पाडण्याची अनेकदा मागणी झाली होती,मात्र राजकीय हस्तक्षेप झाल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात होते. मात्र अखेर हे गाळे पाडण्यात आले.