विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे, इलेक्शन फिव्हरच्या नादात कोण,काय करतील याचा नेम नाही. नांदेड जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवाराने जरांगे पाटील यांची सहानुभूती मिळावी, यासाठी चक्क स्वतःचीच कार जाळल्याची घटना घडली आहे. अपक्ष उमेदवार परसराम दत्ता कदम व अक्षय लहू कदम या काका-पुतण्यांनी हा बनाव रचल्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या तपासात निष्पन्न झाले.