घरफोडी करणाऱ्याला घर मालकीनीनेच पकडले रंगेहाथ! ; महिलेच्या धाडसाचे पोलिसांकडून कौतुक
कल्याणमध्ये घरफोडी करून पसार होण्याच्या मार्गावर असलेल्या चोरट्याला घर मालकीनीने मोठ्या धाडसाने रंगेहाथ पकडले आहे. महिलेच्या या धाडसाचे पोलिसांनी कौतुक करत त्यांच्या सत्कार केला आहे.
कल्याणमध्ये घरफोडी करून पसार होण्याच्या मार्गावर असलेल्या चोरट्याला घर मालकीनीनेच रंगेहाथ पकडले आहे. महिलेच्या या धाडसाचे पोलिसांनी कौतुक करत त्यांच्या सत्कार देखील करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील भारताचार्य चौकात राहणाऱ्या शैलेजा करदकर या आपल्या भावाकडे जेवणासाठी गेल्या होत्या त्या आपल्या घरी परतल्या तेंव्हा एक चोर त्यांच्या घरातून बाहेर पडत असल्याचे त्यांच्या निदर्शानास पडले. हे पाहून या महिलेने आरडाओरडा करीत चोरट्याचा पाठलाग सुरू केला. दुचाकीवर बसलेल्या या चोरट्याचा शैलेजा यांनी पाय घट्ट पकडून ठेवला. चोरटा आपला पाय सोडवण्यासाठी शैलेजा यांना लाथ मारत असतांनाही त्यांनी त्याचा पाय सोडला नाही. शैलेजा यांचा आरडा - ओरड ऐकून चौकातील काही तरुण त्यांच्या मदतीला धावले आणि त्यांनी त्या चोरट्याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, दुसरा चोरटा घरातील दागीने घेऊन पसार झाला होता.
मात्र, ताब्यात घेतलेल्या भामट्याकडे पोलिसांनी चौकशी करून त्याच्या इतर तिन साथीदारांना देखील अटक केली आहे. महिलेचे दागिने परत करीत धाडस दाखवणाऱ्या शैलेजा करदकर या महिलेच्या पोलिसांनी कौतूक केले आहे. त्यांचा सत्कार देखील केला आहे.
शैलेजा यांच्या घरातील जवळपास 10 तोळे सोने घेऊन हे चोरटे पसार झाले होते. मात्र, बाजारपेठचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण यांच्या टीमने पकडलेल्या राहूल मुपणार या चोरट्याकडे चौकशी करून त्याचे इतर साथीदार प्रकाश सोनावणे आणि दीपक कदम यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचे दागिने हस्तगत करत. पोलिसांनी शैलेजा करदकर यांचा सत्कार केला आहे.