व्यवसाय करायचा हे पक्क ठरलं. व्यवसायाचा पारंपारिक वारसा होताच. बचतगट स्थापन केला. पाच मेंढ्याच्या लोकरीपासून सुरु केलेला घोंगडी व्यवसाय आज चांगलाच बहरलाय. ज्या स्त्रियांनी कधी तालुक्याचे गाव पाहिलेलं नव्हतं त्या घोंगडी घेऊन अगदी मंत्रालयातदेखील पोहचल्या. लोकरीपासून घोंगडीपर्यंतच्या प्रवासाबरोबरच या महिलांच्या सामाजिक आर्थिक जीवनात परिवर्तनाचा प्रवास घडला. पहा नांदेडच्या नवदुर्गांची प्रेरणादायी कहाणी...