मंदिरे उघडावी अन्यथा आंदोलन अटळ -तुषार भोसले

राज्यातील मंदिरे उघडावी अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी राज्य सरकारला दिला आहे.;

Update: 2021-08-22 12:41 GMT

संगमनेर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारला राज्यातील मंदिरे उघडण्याचा अल्टीमेटम दिला. भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी संगमनेर येथे बोलताना मंदिरे बंद ठेवण्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी संगमनेर भाजप शहर अध्यक्ष , तालुकाध्यक्ष ,आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी यावेळी बोलताना मंदिरे उघडल्यावर कोरोना वाढतो मग दारूची दुकानं उघडली तर कोरोना जातो का? असा सवाल उपस्थित केला.

ठाकरे सरकार सर्व क्षेत्रांमध्ये अपयशी ठरत आहे अस सांगताना भोसले म्हणाले की, जनतेच्या भावनेचा आदर करत करत ठाकरे सरकारने सोमवार पर्यंत मंदिर उघडली पाहिजे अन्यथा राज्यभर आंदोलन करू असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.

Tags:    

Similar News