दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ऑटो चालकाने दिले जेवणाचे आमंत्रण , केजरीवाल म्हणाले...

Update: 2021-11-23 00:39 GMT

नवी दिल्ली // पंजाबमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये केजरीवालांनी काल मोगा येथे एका सभेला संबोधित केले. दरम्यान एका रिक्षावाल्याने केजरीवाल यांना घरी जेवणाचे आमंत्रण दिले. केजरीवाल यांनी तात्काळ या रिक्षावाल्याचे आमंत्रण स्वीकारले आणि काल रात्री त्या ऑटो चालकाच्या घरी जेवण केले. खुद्द केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.दिलीप तिवारी असं या ऑटो चालकाचे नावं आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्यासह इतर नेत्यांना सोबत आणू का? असं त्या ऑटो चालकाला विचारले, आणि सर्वांनी ऑटो चालकाच्या घरी जेवणाचा आश्वाद घेतला.

सोबतच अन्य एका नेत्यासोबत ऑटो राईडचा आनंदही घेतला दरम्यान, ऑटोचालकाने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले, तेव्हा मी खूप प्रभावित झालो, असे ते म्हणाले. केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार भगवंत मान आणि अन्य एका नेत्यासोबत ऑटो राईडचा आनंदही घेतला. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले की, 'दिलीप तिवारी यांनी आज आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्याच्या कुटुंबाने खूप प्रेम दिले. अतिशय चवदार अन्न होते. मी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आता दिल्लीत माझ्या घरी जेवायला बोलावलेय.

केजरीवाल दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये 'आप'चे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिले जातील, असे केजरीवाल म्हणाले. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक महिलेला हा लाभ मिळेल आणि ही रक्कम वृद्ध मातांना वृद्धापकाळ पेन्शनपासून वेगळी असेल असं केजरीवाल म्हणाले.

Tags:    

Similar News