MSP शेतमालाला हमी भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या या प्रमुख मागण्यासाठी केंद्र सरकार विरुद्ध दिल्लीत शेतकरांचं आंदोलन सुरु आहे.आंदोलन नियंत्रण आणण्यासाठी दिल्ली बॉर्डर वर बॅरिकेट टाकण्यात आले आहेत तसंच आंदोलकांच्या मार्गावर सुरक्षा विभागाने खिळे ठोकले आहेत, अश्रू धुर सोडले आहेत. यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. आज शेतकरी नेते तसंच केंद्र सरकारच्या मंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. ही चर्चा सकारात्मक झाली नाही तोडगा निघाला नाही तर आंदोलन आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. संयुक्त किसान मोर्चा ने 16 तारखेला बंद पुकारला आहे.