पूरबाधितांच्या नुकसानीची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी ; वंचित बहुजन आघाडीची मागणी

पूरबाधितांच्या नुकसानीची प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी धुळे वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. तसेच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचे आदेश शासनाने द्यावेत असंही वंचित आघाडीने म्हटलं आहे.

Update: 2021-08-05 08:34 GMT

 राज्यात गेल्या महिन्या झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या महापूरात अनेकांचे संसार वाहून गेले. त्याचबरोबर नागरिकांचे महत्त्वाचे कागदपत्रे देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. अशावेळी नागरिकांना तात्काळ संबंधित कागदपत्रे प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात यावी, जेणेकरून मदत मिळवण्यासाठी त्यांना अडचणी निर्माण होणार नाही. प्रशासनानने नुकसानीची तात्काळ दखल घेऊन मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे तसेच दरड कोसळल्याने बहुतांश गावांमधील घरांचे नुकसान झाले असल्यामुळे अशा नुकसानग्रस्त नागरिकांना तात्काळ शासनाच्या मदतीने घरे बांधून त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

महापुरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान

दरम्यान या महापुरामुळे पीकांसह शेतीचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी नेहमीच साखर कारखान्यांना ऊस पुरविला आहे, अशा शेतकऱ्यांना साखर कारखान्यांकडून देखील मदत मिळायला हवी, तसे आदेशच प्रशासनाने संबंधित साखर कारखान्यांना द्यावेत अशी देखील मागणी वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

Tags:    

Similar News