अकरावीची सीईटी प्रवेश परीक्षा रद्द!, उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश...
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. परंतू अकरावीची सीईटी परीक्षा मुंबई उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांवर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. यावर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती व १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती. परंतू अकरावीची सीईटी परीक्षा उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याशिवाय सहा आठवड्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य शासनाला देण्यात आले आहेत.