Threat to Sanjay raut : संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

संजय राऊत आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. त्यातच आता संजय राऊत यांना बिश्नोई बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.;

Update: 2023-04-01 05:38 GMT
Threat  to Sanjay raut : संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी
  • whatsapp icon

संजय राऊत (Sanjay raut) हे ठाकरे गटाची बाजू जोरदारपणे मांडताना दिसत आहेत. त्यातच संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या (Bishnoi Gang) नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. (Bishnoi gang threat to Sanjay raut)

संजय राऊत यांच्या मोबाईलवर मेसेज करून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी देणारा पुणे (Pune) शहरातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र धमकी देणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावाने ही धमकी दिली आहे.

लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने यापुर्वी सलमान खान (Salman khan) याला धमकी दिली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.


 



तुम्ही आणि सलमान खान आमच्या टार्गेटवर आहात. तुमचा पंजाबी गायक सिध्दू मुसेवाला (Siddhu Musewala) करू, अशा धमकीचा मेसेज संजय राऊत यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी फिर्याद दाखल केली आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.

संजय राऊत यांना मिळालेल्या धमकीनंतर पोलिसांनी सांगितले की, संजय राऊत यांनी मिळालेल्या धमकीच्या मेसेजनंतर फिर्याद दाखल केली आहे. तसेच पोलिस पुढील तपास करत आहेत.

Tags:    

Similar News