टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला घेतलं ताब्यात
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सौरभ त्रिपाठी असं आहे.
पुणे // टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सौरभ त्रिपाठी असं आहे. सौरभ त्रिपाठी हा जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक असून टीईटी परीक्षा 2018 मध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 2018 च्या टीईटी परीक्षेच्या निकालामध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका त्याच्यावर आहे. याप्रकरणी उत्तरप्रदेशातील लखनऊ येथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
टीईटी परीक्षेत अपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र दाखवण्याचं काम सौरभ त्रिपाठी हा करत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी याआधी जी ए सॉफ्टवेअरच्या अश्विन कुमार याला अटक केली आहे. अश्विन कुमार याला कर्नाटकातील बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे.
सौरभ त्रिपाठी सध्या 'विनर' कंपनीमध्ये कार्यरत आहे. सध्या शिक्षण विभागाच्या परीक्षांचे कामकाज विनर कंपनीकडे आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशातील परीक्षाही वादग्रस्त ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे