Telegram down : टेलेग्राम क्रॅश, ट्वीटरवर मीम्सचा धुरळा

गेल्या काही दिवसांमध्ये व्हॉट्सअप, फेसबुक व इंस्टाग्रामसारखे अॅप डाऊन झाले होते. त्यानंतर ट्वीटरवर मीम्सचा धुरळा उडाला होता. तर आता टेलेग्राम डाऊन झाल्याने ट्वीटरवर मीम्स व्हायरल होत आहेत.;

Update: 2022-01-17 15:57 GMT

गेल्या काही दिवसांपुर्वी लोकप्रिय असलेले फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप क्रॅश झाले होते. तर त्यानंतर फेसबुकने वापरकर्त्यांची माफी मागितली होती. तर तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीरी व्यक्त करत आहोत, असे फेसबुकने म्हटले होते. मात्र त्यावेळी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप बाबत अनेक मजेशीर मीम्स व्हॉयरल होत होत्या. आताही अगदी तशीच परिस्थिती आहे. सोमवारी रात्री 8 च्या आसपास टेलेग्राम क्रॅश झाल्याने त्याबाबत मीम्स व्हायरल होत आहेत.


फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्रामचे सर्वर डाऊन झाल्यानंतर वापरकर्त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. मात्र आता अगदी तशीच परिस्थिती टेलेग्रामची झाली आहे. तर टेलेग्राम डाऊन झाल्यानंतर अनेक वापरकर्त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. मात्र अजूनही टेलेग्रामकडून टेलेग्रामचे सर्वर डाऊन होण्याचे अधिकृत कारण जाहीर केले नाही. मात्र रात्री सव्वानऊ वाजता टेलेग्राम हे मेसेंजर एप पुन्हा सुरू झाले.

 


टेलेग्राम क्रॅश होऊन सर्वर डाऊन झाल्यामुळे ट्वीटरवर सध्या टेलेग्राम डाऊन झाल्याने मीम्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे. तर गेल्या 8 पासून टेलेग्रामचे सर्वर डाऊन झाल्याचे वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे टेलेग्राम क्रॅश होण्याचे अधिकृत कारण कंपनीने जाहीर केल्यानंतरच समोर येणार आहे. मात्र टेलेग्रामचे वापरकर्ते मीम्स व्हायरल करून आपल्या भावना व्यक्त करत आहेत. तर सोमवारी रात्री सव्वानऊ वाजता टेलेग्राम सुरू झाले. त्यामुळे वापरकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.




 


Tags:    

Similar News