बुल्ली अॅपनंतर हिंदू महिलांचे टेलिग्राम चॅनेलवर फोटो शेअर

Update: 2022-01-05 13:47 GMT

गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुल्ली अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो शेअर करण्यात आले होते. तसेच नवीन वर्षाच्या तोंडावर बुल्ली अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो पुन्हा एकदा शेअर करण्यात आल्यानंतर मोठा वाद सुरू असतानाच, एका टेलिग्राम चॅनलवर हिंदू महिलांसोबत सुद्धा अशाच प्रकारचं कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

या टेलिग्राम चॅनलवर हिंदू महिलांचे फोटो शेअर करण्यात आले असून त्यांच्याबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच हे टेलिग्राम चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून, सरकार या प्रकरणी पोलिसांसह योग्य ती कारवाई करत असल्याचं म्हटलं आहे. या टेलिग्राम चॅनलवर अनेक हिंदू महिलांचे फोटो त्यांच्या मर्जी विना शेअर करण्यात आले होते.

दरम्यान, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी बुल्ली अॅप संदर्भात मोठी कारवाई करत दोषींना बेड्या ठोकल्या आहेत. अल्पसंख्याक महीलांच्या बदनामीच्या उद्देशानं तयार केलेल्या बुल्ली अॅप प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आले असून याबाबत नागरीकांना काही माहीती असल्याच कळवावी असं मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी सांगितलं. सोशल मीडियावरच्या काही विशिष्ट समाजातील महिलांचे फोटो साईटवर अपलोड करण्यात आले होते. त्यांच्या भावना दुखावतील असे मेसेज साईटवरुन प्रसारीत करण्यात आले. याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला.

31 तारखेला अॅप लोड करण्यात आला होता. या ऍप आणि ट्विटर हॅन्डलची चौकशी मुंबई पोलिसांनी केली. बुल्ली बाई नावाचं ट्वीटर हॅन्डलही तयार करण्यात आलं होतं. ही वेबसाईट जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, असा उद्देश ठेवून हे सगळं करण्यात आलं. याचे फॉलोअर्स कोण आहे, त्याची माहिती काढून त्यांच्या मागावर पोलिस लागले, असं नगराळे म्हणाले.

बंगलोरमधे दुसऱ्या वर्षात शिकणारा इंजिनिअरींगचा तरुण विशाल कुमार झा चा तपास केला. एकूण पाच फॉलोअर्स होते. त्यांचा शोध घेतला गेला. ज्यांच्या नावानं ट्वीटर सुरु करण्यात आलं होतं, त्यांना एक एक ताब्यात घेतलं गेलं.

आतापर्यंत तिघांना ताब्यात गेतलं. विशाल झा याला ताब्यात घेतलंय. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तरा सिंहला उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर तिसऱ्या आरोपीलाही उत्तराखंडमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.

या प्रकरणात ज्या नागरिकांना माहिती द्यायची आहे, त्यांनी आमच्या वेबसाईटवर माहिती द्यावी. या माहितीच्या मदतीने आम्हाला या प्रकरणाच्या मुळाशी जाता येईल, असं हेमंत नगराळे म्हणाले.

Tags:    

Similar News