घरात घुसून महिलांना धमकी, तहसिलदाराविरोधात गुन्हा दाखल
बीडमध्ये घरातील कोणाचीही परवानगी न घेता घरात घुसून महिलांना गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांनी धमकावले. त्यांच्या सह सात ते आठ अनोळखी व्यक्तींवर याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या तीन महिलांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.;
बीड जिल्ह्यातील गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांनी कोणाचीही परवानगी न घेता घरात घुसून महिलांना धमकावल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर त्यानंतर महिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तहसिलदार सचिन खाडे यांच्याविरोधात तीन महिलांनी गुन्हे दाखल केले आहेत.
गेवराईचे तहसिलदार सात ते आठ अनोळखी व्यक्तींसह घरात कोणाचीही परवानगी न घेता घरात घुसून महिलांना धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. त्यानंतर महिलांनी तहसिलदार सचिन खाडे यांच्यासह सात ते आठ अनोळखी व्यक्तींविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तहसिलदार सचिन खाडे विरोधात गुन्हा दाखल केली आहे.
या तिन्ही फिर्यादी महिला गेवराईच्या समृद्धी नगर भागातील रहिवासी आहेत. त्यांच्या घरी विनापरवाना जाऊन तुम्ही वाळु प्रकरणातील आरोपी लपवुन ठेवले आहेत असे म्हणत धमकवल्याचे या महिलांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अगोदरच गेवराई मधील अवैध वाळु उपशाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता वाळु चा वाद घरापर्यंत गेला असल्याचे दिसून येते.
फिर्यादीत सांगितल्या प्रमाणे तहसीलदार सचिन खाडेंसोबत आणखी सहा ते सात लोक कोण होते ते पोलीस तपासात स्पष्ट होईल. तर या सर्व प्रकरणी जिल्हाधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. याशिवाय महिलांवर अन्याय होत असेल तर आरोपीवर कारवाई होणारच मग तो कोणीही असो अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगिता चव्हाण यांनी दिली आहे.