मुंबईकरांना पाणीपुरवठा करणार्या धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तानसा धरण आज सकाळी 4 वाजून 30 मिनिटांनी पूर्ण क्षमते पेक्षा जास्त भरून वाहू लागल्याने सकाळी धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला. 1100 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, मात्र दुपार नंतर धरणाचे पाणी अधिक वाढले असल्याने दुपारी 12 च्या सुमारास या धरणाचे पुन्हा 7 दरवाजे उघडत 7700 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केल्याची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.