जे बाळासाहेब ठाकरेंना जमले नाही, ते आम्ही करून दाखवले : तानाजी सावंत यांचा दावा
राज्याच्या सत्ता संघर्षात सत्ता परिवर्तन झाले खरे परंतु सतत वादग्रस्त विधान करणारे मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा यांचं वादग्रस्त विधान;
राज्याच्या सत्ता संघर्षात सत्ता परिवर्तन झाले खरे परंतु सतत वादग्रस्त विधान करणारे मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करत जानेवारी महिन्यात मी पहिली बैठक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करून जवळपास एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीडशे बैठक आम्ही घेतल्या असं विधान करत तानाजी सावंत यांनी वाद ओढून घेतला आहे.
“ जे बाळासाहेब ठाकरे, वाजपेयी, अडवाणींनाही जमले नाही, ते आम्ही केले –
२०१७ मध्ये पंढरपुरात सभा होती, आपला समाज, सोलापुरातील किंवा किंवा महाराष्ट्र जनतेला माहित होते, की आपण हे पटांगण सभेसाठी घेतले आहे, ह्या आधी ह्या पटांगणात अटल बिहारी वाजपेयी , आणि हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील सभेस इतकी गर्दी झाली नसेल इतकी गर्दी आपण केली असे विधान आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले.
यावर काँग्रेसने देखील टीका केली आहे
जेव्हा महाराष्ट्रात कोरोना थैमान घालत होता, महाविकास आघाडी सरकारसह सर्व सरकारी यंत्रणा कोरोनाविरोधात लढत होत्या त्यावेळी फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे स्थिर सरकार पाडण्याची आणि खोके जमवण्याची तयारी करत होते.
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 29, 2023
नियती हे सगळं लक्षात ठेवेल. #महाराष्ट्रद्रोही pic.twitter.com/cwfdDp0Yc5
.
त्याच बरोबर त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीबाबत भूमिका मांडली, आणि २०१९ रोजी झालेल्या जनतेने दिलेला कौल त्यांनी नाकारला. भाजप आणि शिवसेना युतीला दीलेला कौल त्यांनी नाकारला, व शरद पवार यांनी त्यात उडी घेत, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या सरकार मध्ये मला स्थान दिले नाही. ही गोष्ट मी मातोश्री वर जाऊन आलो आणि उध्दव ठाकरेंना, म्हटले की मी आता पुन्हा मातोश्री वर येणार नाही असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले, आणि देवेंद्र फडणवीस ह्यांच्या आदेशावरून त्यांनी ३ जानेवारी ला राज्यात पहीली बंडखोरी केली असे सावंत म्हणाले.