तालिबानने रणनिती बदलली, चेहऱ्याचं काय?

Update: 2021-08-17 13:16 GMT

अफगाणिस्तानमध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडीसंदर्भात तालिबानने एक निवेदन सुरु केलं आहे. तालिबानने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे काम पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे.

निवेदनात म्हंटलं आहे की, "सर्व लोकांसाठी एक माफीनामा जारी केला जात आहे. तुम्ही तुमचं दैनंदिन कार्य पुन्हा आत्मविश्वासाने सुरु करायला हवं."

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर दोन दिवसांनी ही माफी मागितली गेली आहे. दरम्यान, ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे. कारण यामुळे सरकारी कर्मचारी आणि इतरांना त्यांच्या नोकऱ्या वाचल्या आहेत, तसेच त्यांच्यावर हल्ला केला जाणार नाही किंवा बदला घेतला जाणार नाही. याची खात्री देणारा आहे.

तसेच तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी यापूर्वीही म्हंटल होतं की, कोणाचाही बदला घेतला जाणार नाही. तसेच सामान्य अफगाणी त्यांचं रोजचं दैनंदिन जीवन जगू शकतात.

मात्र, तालिबान्यांच्या या निवेदनाने त्यांची रणनिती बदलली असल्याचं दिसून येत आहे. मात्र, तालिबान ची जी दहशत जगाने पाहिली आहे. त्याचं काय? तालिबानचा अजेंडा नक्की काय असणार? महिलांवरील बंधनांचं काय? असा सवाल आता उपस्थिती होतो.

तीन देशांचे दूतावास उघडले...

दरम्यान, हे निवेदन अशा वेळी जारी करण्यात आला आहे. जेव्हा बहुतेक देशांनी आपले दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने देखील आपल्या राहिलेल्या लोकांना काबूलमधून बाहेर काढलं आहे. तसंच काबूल दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता काबुलमध्ये फक्त तीन देशांचे दूतावास आहेत. चीन, रशिया आणि पाकिस्तान.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानवर तालिबानचे नियंत्रण या परिस्तिथीच वर्णन 'गुलामगिरीच्या साखळीतून मुक्तता' असं केलं आहे. तर चीनने "सहकार्य आणि मैत्री" चा हात पुढे केला आहे.

चीनने आपल्या नागरिकांना घरात राहण्याचा आणि परिस्थितीबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, दूतावासातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याची त्यांची कोणतीही योजना नाही. तर रशियाचे राजदूत दिमित्री झिरनॉफ मंगळवारी तालिबान नेत्यांची भेट घेणार आहेत.

Tags:    

Similar News