राममंदिर खर्च: पारदर्शकतेसाठी अराजकीय समिती नेमा: जयंत पाटील

Update: 2021-06-17 13:14 GMT

courtesy social media

राममंदिर उभारणीसाठी गोळा होणारा पैसा पारदर्शीपणाने खर्च होतोय की नाही हे बघण्यासाठी देशातील रामभक्तांनी अराजकीय अशी एक समिती तयार करावी. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

राममंदिर उभारणीसाठी जमा झालेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार आणि शिवसेना आणि भाजप यांच्यात बुधवारी झालेल्या हाणामारीचा मुद्दा पत्रकारांनी विचारला असता जयंत पाटील यांनी वरील आवाहन केले आहे.

दरम्यान या समितीने कायम राममंदिर उभारणीतील खर्च, जमाखर्च आणि त्याचा हिशोब हा त्रयस्थ बॉडीने निरीक्षणाखाली ठेवावा. कारण रामभक्तांची अपेक्षा आहे की, प्रामाणिकपणे मंदिराचं पावित्र्य राखून राममंदिर उभं राहावं. अतिशय भक्तिभावाने राममंदिर उभे व्हावे अशी या देशातील रामभक्तांची इच्छा आहे म्हणून रामभक्त मोठ्याप्रमाणावर निधी देत आहेत.

मात्र, राममंदिर उभारणीत गोळा होणार्‍या निधीत भ्रष्टाचार होत असेल तर हे दुदैव आहे अशी तीव्र नाराजी जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

राममंदिर बांधताना हे लोक भ्रष्टाचार करत असतील तर राम यांच्यापासून किती लांब आहे आणि रामापासून हे किती लांब आहेत हे स्पष्ट होते. रामाचा फायदा घेऊन कसे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय फायदे आणि आर्थिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. हे यानिमित्ताने समोर आले आहे. अशी जोरदार टीका जयंत पाटील यांनी भाजपचं नाव न घेता यावेळी केली.

Tags:    

Similar News