टीआरपी घोटाळ्यातील चॅट लीक केल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी: अतुल भातखळकर
अर्नबगेट प्रकरण भाजपच्या अंगाशी आल्यानंतर त्यापासून अंग काढून घेण्याचा प्रयत्न भाजप करत असताना आता थेट तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी चॅट खरे की खोटे? आधी टीआरपी घोटाळ्यातील चाट लीक केल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी अशी अजब मागणी केली आहे.;
टीआरपी घोटाळ्यातील चाट मुंबई पोलिसांनी बाहेर लीक केल्याबद्दल मुंबई पोलिसांवर कारवाई व्हावी. तसेच हे चाट खरे आहेत की खोटे आहेत हे पडताळणे आवश्यक आहे. ह्या विषयाची सुद्धा चौकशी व्हावी. आणि त्यानंतर कारवाई करावी. केवळ बालाकोट नंतर भारतीय सरकार माहिती देईल असं म्हणणं जर माहिती देणं असेल तर ते अत्यंत हास्यास्पद आहे.
रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांचे चॅट उघडकीस आले आहेत. त्यातून त्यांना पुलवामा आणि बालकोटवर हल्ला होणार असल्याचं आधीच माहीत असल्याचं दिसून येतं. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. अर्णव गोस्वामी यांचे कोर्ट मार्शल झालं पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केल्यानंत त्याला अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बगलबच्च्यांना वाटत होतं की, मोदी काही करणार नाहीत पण नरेंद्र मोदींनी आधीच्या आणि बालाकोट हल्ल्याचा मुहतोड जवाब दिला आहे. त्यामुळे या चाटविषयी मुंबई पोलिसांची चौकशी करून कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
सैफ अली खान, डिम्पल कपाडिया, तिग्मांशू धुलिया, कुमुद मिश्रा, सूनील ग्रोव्हर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या तांडव या वेब सीरिजची गेल्या कित्येक महिन्यांपासून चर्चा रंगली आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आल्यापासून ही वेब सीरिज कधी प्रदर्शित होत आहे याची उत्सुकता लोकांना लागलेली होती. ही वेब सीरिज आता प्रदर्शित झाली असून या वेब सीरिजला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
या बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या काही भागामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. तांडव या वेब सीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान केला आहे, तसेच जे एनयुच्या काही दृशांचं चित्रीकरण करून आझादीच्या संदर्भात काही वाक्य आहेत त्यामुळे अॅमेझॉनच्या प्राईमने तांडव सीरीजचे चित्रीकरण तात्काळ थांबवावे अन्यथा कोर्टात जाऊन अॅमेझॉनच्या प्राईमच्या विरोधात कारवाई करेन असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.