Electoral Bonds : न्यायालयाने एसबीआयला फटकारल्यानंतर निवडणूक आयोगात सादर केली रोख्यांची माहिती

Update: 2024-03-13 05:52 GMT

एसबीआय (SBI) कडून निवडणूक रोख्यांविषयीची ( electoral bonds ) सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. सर्वोच न्यायालयाने आदेशानंतर या संदर्भातील माहित निवडणूक आयोगाकडे जमा करण्यात आली. दरम्यान ही माहिती लवकरच निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

एसबीआयने इलेक्टोरल बॉन्ड्स संदर्भातील सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने 'एक्स' पोस्ट करत माहिती आहे. “सर्वोच्च न्यायालयाने भारतीय स्टेट बँकेला दिलेल्या निर्देशांचे पालन करून, भारतीय स्टेट बँकने निवडणूक रोख्यांची संपूर्ण माहिती आज १२ मार्च रोजी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे". असं निवडणूक आयोगाद्वारे एक्स पोस्ट करत सांगण्यात आलं आहे.

निवडणूक रोख्यांसंदर्भात १५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली निवडणूक रोखे योजना रद्द केली होती. ही योजना घटनाविरोधी असल्याचं न्यायालयाने म्हटले होते. तसेच २०१९ पासूनची सर्व माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला SBI दिले होते. यासाठी न्यायालयाने ६ मार्चपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर एसबीआयनं ही मुदत वाढवून देण्याची मागणी करणारा अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला. मात्र, हा अर्ज फेटाळत न्यायालयाने एसबीआयला चांगलेच फटकारले. तसेच १२ मार्च रोजी सायंकाळी ५ पर्यंत ही संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याचे आदेश दिले होते.

Tags:    

Similar News