मराठा आरक्षणावरील अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून...

Update: 2021-02-05 07:29 GMT

राज्यात ज्वलंत बनत चाललेल्या मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडला आहेत. मराठा आरक्षण प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर असून, मागील दोन तीन सुनावण्यापासून अंतिम सुनावणी पुढे ढकलली आहे. ५ फेब्रुवारी म्हणजेच आजपासून सुनावणीला सुरूवात होणार होती. मात्र, पुन्हा एकदा अंतिम सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. राज्य सरकारनं वेळ वाढवून मागितल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरील अंतिम सुनावणीला ८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. तसेच ही सुनावणी प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याबाबतचा निर्णय त्या-त्यावेळीची परिस्थिती पाहून घेतला जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.

तर सुप्रीम कोर्टाने सूनवणीचा वेळापत्रक जाहीर केलं निश्चित याच समाधान असल्याचं मत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी व्यक्त केलं. तातडीने सूनवणी सुरू व्हावी, जे विद्यार्थी आरक्षणाची वाट पाहताय त्यांना ही उत्तर मिळाले हीच आमची भूमिका असल्याचं पाटील म्हणाले. तसेच राज्य सरकारने आता तयारी जोरात करावी कारण बाजू मांडायचा दिवस निश्चित झाला आहे त्यामुळं आता हयगय नको, मराठा संघटनांचे आंदोलन हे कोर्ट विरोधात नाही तर राज्य सरकार विरोधात आहे, आंदोलन मागण्या मान्य होई पर्यंत सुरूच राहील असेही पाटील म्हणाले.

तर आज झालेल्या सुनावणीत झालेल्या निर्णयानुसार 8,9 आणि 10 मार्चरोजी विरोधक बाजू मांडणार,तर 12, 15 16 आणि 17 ला आरक्षण मागणारे आणि राज्य सरकार बाजू मांडणार आहे. त्याचप्रमाणे 18 मार्च केंद्र सरकार बाजू मांडणार आहे.

Tags:    

Similar News