"महाराष्ट्र किती मोठं राज्य आहे हे आपणास ठाऊक आहे काय?"

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मालमत्तेचा काही भाग पाडण्याचे कारण सांगत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करणाऱ्या याचिकाकर्ता विक्रम गहलोतला आज सप्रीम कोर्टानं चांगलच फटकारलं आहे.;

Update: 2020-10-16 09:25 GMT

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करणारी करणारी याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावत आवश्यकता असेल तर राष्ट्रपतींकडे जावून मागणी करा पर इथं येऊ नका. मुंबई म्हणजे महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र किती मोठं राज्य आहे हे ठाऊक आहे का? अशा शब्दात मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी याचिकर्त्याला फटकारलं आहे.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मालमत्तेचा काही भाग पाडण्याचे कारण सांगत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी याचिकाकर्ता विक्रम गहलोत यांनी केली होती. मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे, विक्रम गहलोत आणि न्यायमूर्ती ए.एस. बोपन्ना आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आली असता, कोर्टाने यासारख्या मागण्यांचे मनोरंजन करता येणार नाही असं सांगितलं.

"याचिकाकर्ता म्हणून आपण राष्ट्रपतींकडे जाण्याचे स्वातंत्र्य आहात, पण येथे येऊ नका."घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींच्या अनुषंगाने राज्यातील कामे पार पाडली जात नाहीत, या याचिकेत युक्तिवाद करण्यात आला होता. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूची आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मालमत्तेचा काही भाग पाडल्याची उदाहरणे याचिकाकर्त्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नांची उदाहरणं म्हणून दिली होती.

"तुम्ही म्हणताय की काही बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात घटनेचे पालन केले जात नाही?" त्यानंतर न्यायाधीश बोबडे यांनी याचिकेत मांडलेली प्रत्येक घटना मुंबईतील असल्याचे निदर्शनास आणून दिले. "महाराष्ट्र किती मोठा आहे हे आपणास ठाऊक आहे काय?", असे बोबडे यांनी याचिकाकर्त्याला विचारले की, एकट्या मुंबईतच संपूर्ण राज्य अस्तित्त्वात नाही असे सांगत मनोरंजनासाठी सुप्रिम कोर्टात येऊ नये असे सांगितले.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या मालमत्तेचा काही भाग पाडण्याचे कारण सांगत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडल्यानं राष्ट्रपती राजवट लागू करणाऱ्या याचिकाकर्ता विक्रम गहलोतला आज सप्रीम कोर्टानं चांगलच फटकारलं आहे. 


Tags:    

Similar News