पेगासस हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
पेगासस हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅकिंग झाल्याचा संशय असलेल्या नागरिकांनी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई // पेगासस हेरगिरी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पेगासस स्पायवेअरद्वारे फोन हॅकिंग झाल्याचा संशय असलेल्या नागरिकांनी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वृत्तपत्रांमधून याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. पेगासस प्रकरणाने भारतासह जगभरात खळबळ उडाली होती.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या तांत्रिक समितीने याबाबत आवाहन करणारी नोटीस प्रसिद्ध केली आहे. ज्या नागरिकांना पेगासस स्पायवेअरद्वारे आपल्या मोबाईलमध्ये हल्ला करण्यात आल्याचा संशय आहे, त्यांनी 7 जानेवारीच्या आधी एक ई-मेल पाठवणे गरजेचे असल्याचे या नोटिसमध्ये म्हटले आहे.
सोबतच जर, तुम्ही दिलेल्या कारण योग्य वाटल्यास समिती तुमचा मोबाइल तपासणीसाठी मागण्याची विनंती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मोबाइल जमा करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या समितीकडून एक पावती देण्यात येणार असून एक डिजीटल फोटोदेखील देण्यात येणार आहे. नवी दिल्लीत हे सगळे फोन एकत्र करण्यात येणार असून तपासणीनंतर त्यांना पुन्हा देण्यात येणार आहे.
गेल्या वर्षी पेगासस स्पायवेअर द्वारे जगभरातील राजकीय नेते, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा फोन हॅक करून त्यांची हेरगिरी करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला होता. भारतातही या पेगाससचा वापर करून सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षांचे नेते, पत्रकारांवर पाळत ठेवली असल्याचा आरोप करण्यात आला होता.