भारतीय जनता पार्टीचे नेते माधव भांडारी यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे काल रात्री पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 60 वर्ष होतं.
भंडारी यांच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी सुमित्रा भांडारी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज दुपारी 4 वाजता पुण्यातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे निकटवर्त्यांनी सांगितले.
सुमित्रा भांडारी या परभणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानासाहेब वेलणकर यांच्या कन्या होत्या. विद्यार्थी दशेपासून त्या परभणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत होत्या. लग्नानंतर त्या कोकण विभागात विविध सामाजिक संघटना आणि संस्थासोबत काम करत होत्या. भांडारी यांच्या पत्नीच्या निधनाची माहिती मिळताच भाजपसह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वाहिली श्रद्धांजली
सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुमित्रा भंडारी यांचे निधन दुःखद आहे. मी @Madhavbhandari_ जी व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती आणि भंडारी कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 pic.twitter.com/QhZ7Wq677w
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 4, 2023
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विट करत सुमित्रा भांडारी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते @Madhavbhandari_ जी यांच्या पत्नी
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 4, 2023
सौ.सुमित्रा माधव भांडारी ह्यांचे अल्पशा आजाराने पुणे येथे दुःखद निधन झाल्याचे समजले..
माझ्या संवेदना त्यांच्या परीवारासोबत आहेत
माधवजी व त्यांच्या परीवाराला हे दुःख सहन करण्यास परमेश्वर बळ देवो
ॐ शांती …🙏