अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी जितेंद्र शिंदे यांने कारागृहात आत्महत्या केली आहे. जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. जितेंद्र शिंदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. कारागृहात कैद्याची आत्महत्या होणे हे मोठी घटना असून याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
शिंदे हा कोपर्डी घटनेचा दोषी असून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आज सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पहाटे गस्तीवर गेले असताना पोलिसांना शिंदेचा मृतदेह आढळून आला.
कोपर्डीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याबद्दल तिघा जणांना फाशीची शिक्षा झाली होती. जितेंद्र ऊर्फ पप्पू शिंदे याच्या कुकृत्याने कोपर्डी गाव हादरले होते. ही घटना १३ जुलै रोजी घडली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५, रा. कोपर्डी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते.
शालेय मुलीवर निर्दयीपणे अत्याचार करून राक्षसी वृत्तीने तिचा खून केला, ही घटना कोणाही सामान्य माणसाला संताप आणणारी होती. त्यामुळेच आरोपी नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांच्यावर न्यायालयाच्या जुन्या इमारत परिसरात दोनदा हल्ला झाला होती. तर न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आवारात ‘शिवबा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सशस्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.