औरंगाबाद: शेतकऱ्यांच्या ऊसाची देणी थकल्यामुळे शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिली आहेत.
भुमरे यांचा पैठण मतदारसंघात शरद सहकारी साखर कारखाना आहे. मात्र, या कारखान्याने शेतकऱ्यांची ऊसाची देणी न दिल्याने साखर आयुक्तांनी कारखाना जप्तीचे आदेश काढले आहेत. आता औरंगाबादचे जिल्हाधिकाऱ्या हे आदेश प्राप्त झाले असून ते आता नक्की काय कारवाई करतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
किती आहे थकीत रक्कम?
शेतकऱ्यांची तब्बल 17 कोटी 49 लाख रुपयांची देणी थकली आहे. कारखाना जप्त करुन शेतकऱ्यांची देणी देण्यात येणार आहे.