१९७५ सारखीच सध्या माध्यमांची कणा नसलेली भूमिका

Update: 2023-05-30 07:11 GMT

भाजपचे(bjp) नेते तथा माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy)यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यशैली वर ट्विट करत टीका केली आहे. १९७५-७७ दरम्यान च्या आणीबाणीची (Emergency) तुलना करताना स्वामी म्हणाले, " सध्या माध्यमांमध्ये ताठ कणा दिसत नाही. त्यावेळी व्ही. सी. शुक्ला (v.c.shukla ) नावाचे मंत्री होते. त्यांनी माध्यमांना येणकेण प्रकारे वाकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, माध्यमं काही प्रमाणात वाकली देखील.

अशा परिस्थितीत मुख्य प्रवाहातील माध्यमांपैकी केवळ रामनाथ गोयंका हेच याविरोधात भूमिका घेत उभे राहिले. विशेष म्हणजे गोयंका हे पत्रकार नव्हते. मात्र, आज तसा कोणी गोयंका दिसत नाही. पंतप्रधान कार्यालयातील तुलनेनं कनिष्ठ असलेल्या हिरेन जोशी या अधिका-यापुढे बहुतांश माध्यमं लोटांगण घालत असल्याचं स्वामी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय.

Tags:    

Similar News