विद्यार्थी आणि शिक्षकांना देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून द्यावी - गडकरी

Update: 2021-10-17 12:22 GMT

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागपूर महानगरपालिकेने महापालिका शाळेतील हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांना देशाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून द्यावी. त्यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इतिहासावर आधारित चित्रपट दाखवावे. तसेच इतर माध्यमातून विद्यार्थ्यांचा देशाच्या इतिहासाबद्दल ज्ञान वाढवावे अशी सूचना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे. ते नागपुरात महानगरपालिकेने आयोजित केलेल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या शिलालेखाच्या लोकार्पण समारंभात बोलत होते. विशेष म्हणजे हे वर्ष "विश्वविजयी तिरंगा प्यारा" या झेंडा गीताचे रचनकार श्यामलाल गुप्त यांची 125 व्या जयंती आहे. त्यानिमित्ताने महानगरपालिकेने आज नागपूर शहरात अनेक ठिकाणी सामूहिक झेंडा गीताचे गायन ही आयोजित केले होते. 11 वाजता नागपूरच्या संविधान चौकावर राज्यघटनेच्या प्रास्ताविकेच्या लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही सामूहिक झेंडा गीताच्या गायनात सहभागी झाले. विद्यार्थीदशेत अशा कार्यक्रमांचा अनुभव विद्यार्थ्यांना इतिहास संदर्भात गोडी निर्माण करणारा ठरतो असेही गडकरी म्हणाले.

तर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी उभारण्यात आलेली संविधानाची उद्देशिका नागरिकांना संविधानाचा महत्त्व पटवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरेल असं सांगितलं

Tags:    

Similar News