कोरोनाच्या संकटामुळं वर्षभर शिक्षण ऑनलाईन घेतलं आताा मग परीक्षा ऑफलाईन का? असा प्रश्न उपस्थित करत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचं शिवाजी पार्कवर आंदोलन केलं आहे. राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 23 एप्रिलपासून ऑफलाईन पद्धतीने होतेय. मात्र, याला दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केलाय. याविरोधात मुंबईत शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांनी विरोध केला. वर्षभर शिक्षण ऑनलाईन मग परीक्षा ऑफलाईन का? असा सवाल करत या विद्यार्थ्यांचा सवाल आहे.
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यायला विरोध केलाय. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच घ्याव्यात या मागणीसाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील विद्यार्थांनी एकत्र येऊन आंदोलन केलंय. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवसेना भवनपासून जाण्यास सांगितले आहे. सध्या हे विद्यार्थी शिवाजी पार्कवर आंदोलन करत आहेत. आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या पाहता शिवाजी पार्क परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. पोलिसांच्या 4 गाड्या आंदोलनस्थळी दाखल झाल्या असून पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.