सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा, विद्यार्थी आंदोलकांनी केली सभागृहाची तोडफोड

गेल्या अनेक दिवसांपासून शुभम जाधव या rapper च्या रॅपची सावित्रीबाई फुले विद्यापीठात चर्चा आहे. संबंधित रॅप मध्ये अपशब्द असल्याने विद्यापीठाची गरिमा खराब होत असल्याचा आरोप विद्यार्थी स्तरातून केला जात होता. या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने तक्रार केली होती. या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिवांवर मोठ्या प्रमाणावर आरोप केले जात असून या प्रकरणी कुलसचिवांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Update: 2023-04-24 10:17 GMT

   गेल्या अनेक दिवसांपासून शुभम जाधव या rapper च्या रॅपची सावित्रीबाई फुले विद्यापीठात चर्चा आहे. संबंधित रॅप मध्ये अपशब्द असल्याने विद्यापीठाची गरिमा खराब होत असल्याचा आरोप विद्यार्थी स्तरातून केला जात होता. या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने तक्रार केली होती. या संपूर्ण प्रकरणात विद्यापीठाच्या कुलसचिवांवर मोठ्या प्रमाणावर आरोप असून, त्यांनी शुभम जाधव ला पाठबळ दिले आहे.

त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसह विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले.

या आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाची तोडफोड झाल्याचा आरोप अनेक विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

आम्ही विद्यार्थी संघटनांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, विद्यार्थी कृतिशील समितीचे राहुल ससाने म्हणाले, "2019 मध्ये विद्यापीठाच्या रिफेक्ट्री मध्ये भोजनाच्या निकृष्ट दर्जा-संदर्भात आंदोलन केले होते. तेव्हा 12 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेल्या सभागृहाची तोडफोड करण्यात आली आहे. हा महाराजांचा अपमान आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर विद्यापीठ कारवाई करणार का ? गुन्हे दाखल करणार का ? " असा प्रश्न विचारला जात आहे.

ओंकार बेनके म्हणाले,"महाराजांचे नाव असलेल्या सभागृहाची तोडफोड करणाऱ्या आंदोलकांवर विद्यापीठ प्रशासनाने गुन्हे दाखल केले पाहिजेत. महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही...!"

Adv. कुलदीप आंबेकर म्हणाले, " प्रत्येक विद्यार्थी संघटनेला आंदोलन करणे हा संविधानिक हक्क आहे.परंतु या आंदोलनामुळे हिंसा होत असेल.तर दुर्दवी बाब आहे.मूळातच अशा स्वरुपाची आंदोलन करणार्‍यावर कारवाई विद्यापीठ प्रशासनाने करावी .ज्या प्रकारे तत्परता रॅप करणार्‍या विद्यार्थीवर कार्यावाही केली तशीच कार्यवाही या संघटनेवर प्रशासन करणार का?"

आम्ही या संदर्भात आंदोलनकर्त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी पुणे शहर सहमंत्री अमोल देशपांडे म्हणाले, "गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यार्थी हितासाठी काम करत आहे. आम्ही अशा हिंसक प्रवृत्तीचे समर्थन करत नाही. आम्ही कुठल्याही प्रकारची तोडफोड केलेली नसून संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल आम्ही विद्यापीठाच्या कुलसचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही.

Tags:    

Similar News