एसटीचा संप सुरुच , औरंगाबाद शहरातल्या 223 बसफेऱ्या रद्द

facebooktwitter-greylinkedin
Update: 2021-11-08 04:58 GMT
एसटीचा संप सुरुच , औरंगाबाद शहरातल्या 223 बसफेऱ्या रद्द
  • whatsapp icon

औरंगाबाद : एसटी महामंडळाचा शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे , वेतनवाढ यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी संघटनांच्या नेतृत्वात दिवाळीपासून संपावर आहे. औरंगाबादमधील सिडको आणि मध्यवर्ती बसस्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांनी कालपासून संपात सहभाग नोंदवला. काल दुपारी टप्प्याटप्प्याने बारा वाजेपर्यंत संपूर्ण बससेवा ठप्प झाली. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दिवसभरात शहरातील दोन्ही आगारातील 223 बस फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. या संपामुळे एसटीचे 24 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले तर जिल्ह्यात सर्वच आगारातील मिळून एकूण 916 बसच्या फेऱ्या काल रद्द करण्यात आल्या.

दरम्यान आज राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या दिवाळीच्या सुट्या संपत आहेत. कामाचा दिवस असल्याने अनेकांना आपापल्या ड्युटीच्या गावी जायचे आहे. मात्र बस सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी या परिस्थितीचा गैरफायदा घेत दाम दुप्पट भाडे घेण्यास सुरुवात केली आहे.

Tags:    

Similar News