यवतमाळमधील पोलिओ लसीकरणाच्या घटनेवर कठोर कारवाई: आरोग्यमंत्री टोपे

यवतमाळमध्ये घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्रच्या कापसी (कोपरी) येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान १२ लहान मुलांना पोलिओ लसीकरणावेळी पोलिओचा डोस म्हणून सॅनिटीझर पाजल्याची धक्कादायक घटना घडली. डॉक्टरांचा हलगर्जीपणा निष्पाप बालकांच्या जीवावर उठला असून पोलिओऐवजी सॅनिटायझर दिल्याची ही अक्षम्य चूक‌ आहे या घटनेची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गंभीर दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले आहे.;

Update: 2021-02-02 09:43 GMT

याप्रकरणी या केंद्रावरील आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर या सेविकेवर कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात आता टप्प्याटप्प्याने सर्व गोष्टी सुरू करण्यात येत आहेत. ६वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

१ फेब्रुवारी पासून रेल्वे, मुंबईची जीवनवाहिनी 'मुंबई लोकल' देखील सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण कोरोना संपुष्टात आला आहे असं नाही महाराष्ट्रात ४० हजार रुग्ण अॅक्टिव्ह असून प्रत्येक जिल्ह्यात १० ते १५ रुग्ण मिळत असून कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोना अजून सगळा संपला नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

Full View

तसेच कोरोनाची लस मोफत मिळावी अशी मागणी राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारकडे केली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलची दारे जवळपास दहा महिन्यांनी खुली झाली आहेत. मात्र प्रवास करण्यासाठी प्रवाशांना वेळेचं बंधन असून त्याचं उल्लंघन केल्यास दंड ठोठावणार आहे. सर्वसामान्यांकडून लोकलच्या वेळा बदलण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता आहे, सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलच्या वेळा नक्कीच बदलू शकतात. लोकांचं हित आणि गरज त्यांच्या संदर्भाने सोयीचं असणं महत्वाचा विषय आहे. सुधारणा होण्याची गरज असेल तर आमचा विभागदेखील कळवेल आणि राज्य सरकारही त्यासंदर्भात निर्णय घेईल".



Tags:    

Similar News