आमदार संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

Update: 2024-02-10 03:44 GMT

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरत आहे. कळमनुरी विधानसभेतील विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी एक अजब विधान केले, "आई-वडील जर मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका." या वक्तव्यामुळे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दरम्यानं बांगर म्हणाले की , "आई-वडील जर मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका. असा अजब सल्ला त्यांनी शाळकरी मुलांना दिला. ते पुढे म्हणाले की " त्यांनी विचारलं का जेवत नाही ? तर म्हणा आमदार संतोष बांगर यांना मतदान करा, मग जेवू, नाहीतर जेवू नका." असं वक्तव्य बांगर यांनी केलं आहे. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होतं आहे. असल्यानं बांगर हे पुन्हा वादात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:    

Similar News