पत्रकार राणा आयुबचा छळ थांबवा, संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांचे सरकारला आवाहन, सरकारकडून तातडीने उत्तर
द वॉशिंग्टन पोस्टच्या पत्रकार आणि मानवी हक्क कार्यकर्त्या राणा आयुब यांचा कायदेशीर छळ थांबवावा, असे संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी केंद्र सरकारला आवाहन केले. त्यावर सरकारने तातडीने उत्तर दिले आहे.
पत्रकार राणा आयुब यांच्यावर होणारे सांप्रदियिक हल्ले थांबायला हवेत. तसेच सरकारच्या तपास संस्थांकडून होत असलेला राणा आयुब यांचा छळ थांबवावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी भारत सरकारला म्हटले आहे की, पत्रकार राणा आयुब विरोधात होत असलेल्या ऑनलाईन सांप्रदायिक हल्ल्यांची चौकशी करून असे हल्ले सरकारने थांबवायला हवेत. तसेच राणा आयुबचा होत असलेला कायदेशीर छळ सरकारने थांबवायला हवा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांनी केले आहे. त्यावरून भारत सरकारने तातडीने उत्तर दिले आहे.
संयुक्त राष्ट्राने केलेल्या ट्वीटला प्रत्युत्तर देतांना भारत सरकारने म्हटले आहे की, पत्रकार राणा आयुब यांच्या न्यायिक छळाचा आरोप निराधान आणि चुकीचा आहे. भारत हा कायद्याने चालणारा देश आहे. मात्र समानतेच्या कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. आम्ही अचूक आणि वस्तुनिष्ठ माहितीवर विश्वास ठेवतो. त्यामुळे संयुक्त राष्ट्राकडून होणारे आरोप हे दिशाभुल करणारे आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्राची प्रतिमा मलिन होऊ शकते.
त्यामुळे राणा आयुब यांच्याबद्दल संयुक्त राष्ट्राने न्यायिक छळ आणि त्यांच्यावर होणारे सांप्रदायिक हल्ले व त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या थांबवण्याच्या केलेल्या भारत सरकारने तातडीने प्रत्युत्तर दिले.
राणा आयुब यांच्यावर ईडीची कारवाई :
गेल्या काही दिवसांपुर्वी राणा आयुब यांची मनी लाँडरींग प्रकरणी चौकशी सुरू आहे. तर त्यांनी कोरोना विरोधात लढण्यासाठी ऑनलाईन क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा केले होते आणि ते पैसे राणा आयुब यांनी स्वतःच्या खात्यात वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर राणा आयुब यांचा न्यायिक छळ होत असल्याचे ट्वीट संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञांनी केले होते. मात्र या ट्वीटला भारत सरकारने प्रत्युत्तर दिले आहे.