संपुर्ण प्रवासी हवाई वाहतूक स्थगित करा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
युरोपातील इंग्लडसह अनेक देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणुनाचा नवा प्रकार आढळल्यानं लॉकडाऊन आणि हवाईबंदी केली असताना भारतातील कोरोना लाट थोपवण्यासाठी तातडीने संपूर्ण प्रवासी हवाई वाहतूक स्थगित करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.;
जगभरात कोरोनाला थोपवण्याठी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी संशोधक दिवसरात्र एक करत आहे. अमेरिकेसारख्या देशात तर लसीकरणास सुरुवातही झाली आहे. मात्र, इंग्लंड देशात कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 1000 रुग्णांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाली आहे.ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी शनिवारी लंडन आणि आसपासच्या भागात कडक निर्बंध जाहीर केल्याची माहिती आहे.
टीश शास्त्रज्ञांनी या नवीन प्रकारच्या व्हायरसला 'व्हीयूआय 202012/01' नाव दिले आहे. नेदरलँड्स आणि इतर देशांनी ब्रिटनहून येणार्या विमानांवर बंदी घातली आहे.ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. ब्रिटनसह नेदरलॅड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही करोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे.
विषाणूच्या नव्या प्रकारामुळे भारतही सर्तक झाला असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज तातडीची बैठक बोलावली आहे.
आज ही बैठक होत असून, आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार असल्याचं एम्सच्या तज्ज्ञांनी सांगितलं.