दोन गटात तुफान दगडफेक, घटनेत चार पोलीस जखमी

Update: 2021-10-20 08:46 GMT

सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या पोस्टवरून काय होईल हे सांगता येत नाही. उस्मानाबाद शहरात अशाच एका व्हायरल झालेल्या पोस्टवरून वाद झाले. या वादाचं रूपांतर दगडफेकीत झालं. ही दगडफेक नियंत्रणात आणताना घटनास्थळी बंदोबस्तास असलेले चार पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत.

उस्मानाबाद शहरातील विजय चौक येथे रात्री १० च्या सुमारास दोन गटात एका व्हायरल पोस्टवरून तुफान दगडफेक झाली. ही दगडफेक नियंत्रणात आणताना घटनास्थळी बंदोबस्तास असलेले चार पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या शासकिय रुग्णालयात उपच्यार सुरू आहेत .घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अंजुम शेख , स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन घाडगे , शहर पोलीस निरिक्षक सुरेश बुधवंत , तहसिलदार गणेश माळी यांनी बंदोबस्तासह परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलीस प्रशासनाने या दोन्ही गटातील कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई केली आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असं अवाहन स्थानिक शहर पोलीस निरीक्षक सुरेश बुधवंत यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News