#FARMERPROTEST : मोदी सरकारने गुन्हा दाखल केल्यानंतरही ग्रेटा थनबर्ग भूमिकेवर ठाम
शेतकरी आंदोलनावरुन आता जागतिक पातळीवरील पर्यावरण १८ वर्षांची कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि मोदी सरकार असा संघर्ष निर्माण झाला आहे.
शेतकरी आंदोलनावर ट्विट करणारी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी सकाळी ग्रेटा थनबर्गने शेतकऱ्यांबद्दल चिंता व्यक्त करत आम्ही भारतीय शेतकऱ्यांच्या आंदोलनात त्याच्यासोबत एकत्रितपणे उभे आहोत अस ट्विट केलं होतं. त्यात भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची टि्वट केल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे.
मंगळवारी ट्विट केल्यानंतर ग्रेटाने गुरूवारी ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला जागतिक पातळीवर समर्थन देण्यासाठी करण्यात आलेले नियोजनाची फाइल प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची रणनीती नमूद करण्यात आली होती. पण हे ट्विट तिने थोड्या वेळात डिलीट केलं. हे ट्विट डिलीट केल्यानंतर तिने आणखी एक ट्विट करत एक फाइल शेअर केली होती. आता गुन्हा दाखल झाल्यानंतरही ग्रेटानं मी शेतकऱ्यांसोबत असल्याचं पुन्हा ट्विट केलं आहे.
I still #StandWithFarmers and support their peaceful protest.
— Greta Thunberg (@GretaThunberg) February 4, 2021
No amount of hate, threats or violations of human rights will ever change that. #FarmersProtest
२६ जानेवारीला भारतासह परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची योजना जुन्या ट्विट मधून हटवण्यात आली होती. त्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये तिने जर तुमची मदत करण्याची इच्छा असेल तर ही नवीन फाइल आहे. मागची फाइल जुनी होती म्हणून ती डिलीट केल्याचं म्हटलं आहे. ग्रेटा थनबर्गने मंगळवारी रात्री टि्वट केले. आपण भारतातील शेतकरी आंदोलनाच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असे तिने म्हटले होते. त्याचवेळी तिने या आंदोलना संदर्भातील सीएनएनचा लेखही शेअर केला होता. पॉप स्टार रिहानाच्या पाठोपाठ ग्रेटा थनबर्गने केलेल्या टि्वटमुळे जगाचे लक्ष या आंदोलनाकडे वेधले गेले आहे.
दिल्ली पोलिसांनी ग्रेटाविरोधात केस दाखल केली असून या प्रकरणाचा खोलवर तपास केला जात असल्याचं म्हंटले आहे. ग्रेटा थनबर्गवर १५३ अ (धर्माच्या आधारावर वेगवेगळया गटांमध्ये वैरभाव निर्माण करणं) आणि कलम १२० ब (गुन्हेगारी कट रचण) या कलमातंर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.
ग्रेटा थनबर्ग आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस तसेच आंतरराष्ट्रीय समुदायातील अनेकांनी केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यापूर्वी आणि त्याबद्दल कोणतीही टिपण्णी करण्यापूर्वी तथ्यं जाणून घेतली पाहिजेत, खळबळजनक टिपण्णी करणे योग्य नसून ते जबाबदारपणाचे लक्षण नसल्याचे म्हटले आहे.