छ. शिवाजी महाराजांचा पुतळा सर्वांना प्रेरणा देत राहील - छ.संभाजी राजे भोसले

Update: 2024-10-05 11:36 GMT

समस्त जगात स्वराज्यभूमी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक रायगडच्या रोहा येथील कुंडलिका नदीवरील उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी परीसरातील छ. शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा न भूतो न भविष्यतो असा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला. यावेळी छ. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा 25 फुटी उंचीचा पुतळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त रोह्यात दाखल झाले होते. छ. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांनाच प्रेरणा देत राहील असे उद्गार युवराज छ.संभाजी राजे भोसले यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमास खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे तसेच अष्टप्रधान मंडळातील प्रमुख सरदारांचे वारसदार, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Full View

Tags:    

Similar News