देशभरात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत असताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा आरोप केल्याने त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे. दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे, असा आरोप करत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दानवेंवर जोरदार टीका केली आहे.
एवढेच नाहीतर शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या दानवेंच्या घरापर्यंत आम्ही याआधी गेलो होतो, आता घरात घुसून मारावे लागेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर दानवेंचा डीएनए हिंदुस्थानी आहे की पाकिस्तानी आहे याचा तपास करणे गरजेचे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.