लॉकडाऊनचा फटका बसलेल्या घरकामगारांबाबत २ महिन्यात निर्णय – यशोमती ठाकूर
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसलेल्या घरकाम करणाऱ्या कामगारांसाठी मंगळवारी महत्त्वाची घडामोड झाली आहे.
लॉकडाऊनच्या काळात घरकाम करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणींचा सामना करवा लागला. अजूनही अनेक महिलांना रोजगार मिळालेला नाही, या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक आयजित केली होती. या बैठकीमध्ये असंघटित कामगार संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये पुढच्या 2 महिन्यात घरकाम करणाऱ्या महिलांच्या समस्यांचा आढावा घेऊन धोरणात्मक निर्णय करू असे आश्वासन कामगार मंत्री दिपील वळसे पाटील यांनी दिल्याची माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.