लहान मुलांचं लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार आग्रही-आरोग्यमंत्री टोपे

Update: 2021-10-18 14:27 GMT

जालना  :  लहान मुलांचं लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार आग्रही असून या संदर्भात राज्य सरकार तयारी करत असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.

लहान मुलांचे लसीकरण करण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे आग्रह धरणार असल्याचं देखील टोपे यांनी म्हटले आहे. त्यासाठी कोव्हॅक्सीन आणि झायड्स या लसीचं नियोजन करण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे देखील टोपे म्हणाले. खासगी क्षेत्राला या लसीकरणा सहभागी करून घेता येईल का? याबाबत देखील विचार सुरु असून मुंबईतील हॉटेल,रेस्टॉरंटच्या वेळ वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.

काल मुंबईत कोरोनाचा एकही मृत्यू नसून ही समाधानाची बाब असून तिथे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याचं ते म्हणाले. याचंच अनुकरण संपूर्ण राज्यात होणार असून मिशन कवचकुंडलची वाढ करणार असल्याचे टोपे म्हणाले.राज्यात लसीकरणाला गती देणार असून आतापर्यंत राज्यात 9 कोटी लसीकरणं झाल्याचं ते म्हणाले. देशात लसीकरणात महाराष्ट्र क्रमांक 1 चं राज्य असून आपल्याला लसीकरणं वाढवायचे असल्याचं देखील ते म्हणाले.

22 ऑक्टोबर असून अम्युझमेंट पार्क सुरू असून तिथे लोकांनी कोरोनासाठी घालून दिलेले नियम पाळावे असं आवाहन त्यांनी केलं. राज्यात शाळा सुरू झालेल्या असून आता आणखी शाळा सुरू होत आहे, त्यामुळे शिक्षकांनी लसीकरण करून घेतलेलं असावे,विद्यार्थ्यांनी देखील लसीकरण करणं गरजेचं आहे. मात्र, त्यासाठी सक्ती नसल्याचं टोपे म्हणाले. कॉलेज देखील सुरु होत असून विद्यार्थ्यांनी देखील लसीकरण करून घ्यावे असेही ते म्हणाले. राज्यात दररोज 7 ते 8 लाख लसीकरणं होत असून ज्यांनी लस घेतलेली नाही अशा सगळ्याच घटकांना लसीकरण केंद्रावर आणून त्यांना लसीकरण करून घ्यावे लागणार असून त्यासाठी सूक्ष्म नियोजन करणार असल्याचे सांगत या लसीकरणासाठी वार्डवाईज नियोजन करणार असल्याचं देखील टोपे म्हणाले.राज्यात 70 टक्क्यांपर्यंत पहिल्या डोसचे लसीकरन झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Tags:    

Similar News