Starlinks : आकाशात दिसले रहस्यमय स्टारलिंक्स
राज्यात विविध ठिकाणी आकाशात स्टारलिंक्सची ट्रेन दिसली. पण हा स्टारलिंक्सचा संच स्पेस एक्स संचलिक उपग्रहांचा समूह असण्याची शक्यता खगोल तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.;
राज्यात विविध ठिकाणी आकाशात स्टारलिंकची (Starlink) ट्रेन दिसली. पण स्टार लिंकची दिसलेली रहस्यमय चैन हा स्पेस एक्स (Space X) द्वारे संचलित इंटरनेट उपग्रहांचा (Internet satellite) समूह असल्याचे चंद्रपूरच्या (Chandrapur) स्काय वॉच गृपचे अध्यक्ष प्रोफेसर सुरेश चोपणे यांनी सांगितले.
यावेळी सुरेश चोपणे म्हणाले, स्टार लिंक हे स्पेस एक्स द्वारे संचालित इंटरनेट उपग्रहांचा समूह आहे. जो 47 देशांना उपग्रह इंटरनेट कव्हरेज प्रदान करतो. त्याचे यावर्षी नंतर जागतिक मोबाईल सेवेचे उद्दिष्ट आहे. स्पेस एक्स ही एलन मस्क (Elon Musk) यांची खाजगी इंटरनेट कंपनी आहे. या संस्थेने 2019 मध्ये स्टार लिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. डिसेंबर 2022 पर्यंत स्टार लिंक मध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 3300 पेक्षा जास्त वस्तुमान निर्मित लहान उपग्रहांचा समावेश आहे.
स्टार लिंक उपग्रहांचा समूह गुरुवारी यवतमाळ (Yavatmal), रत्नागिरी (Ratnagiri), नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad) यासह राज्यातील विविध शहरांमध्ये दिसल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले होते.
स्टारलिंकविषयी News Nation TV चे असोसिएट एडिटर प्रवीण मुधोळकर (Praveen Mudholkar) म्हणाले, नागपूरच्या (Nagpur) कोंढाळी भागात रात्री आकाशात काही रहस्यमय लाईट दिसली. तज्ज्ञांच्या मतानुसार स्टारलिंकची दिसलेली ट्रेन हा स्पेस एक्सचा उपग्रहांचा समूह असण्याची शक्यता आहे.
Strange mysterious lights seen in night sky in #Maharashtra. Experts
— Praveen Mudholkar (@JournoMudholkar) February 2, 2023
says they may be #SpaceX's Starlink #satellite s. The strange lights forming a 'train-like string' were seen in different parts of #Nagpur district like Kondhali. @mieknathshinde @Dev_Fadnavis@isro pic.twitter.com/irFR1kSLCL