शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी फेकल्या चपला

Update: 2022-04-08 10:48 GMT

नुकतेच एसटी (st workers) कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपतय की काय असे वाटत असतानाच एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाल्याचे समजते आहे. आज एस टी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या मुंबईमधील सिल्वर ओक (silver oak)या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले.

आक्रमक झालेले कर्मचारी अचानकपणे आज शरद पवार यांच्या निवास स्थानाच्या आवारात शिरले.यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पलफेक देखील केली.शिवाय शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.बंगल्याच्या बाहेर मोजकाच पोलिस बंदोबस्त असल्याने आणि आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बराच गोंधळ त्या ठिकाणी उडाला.

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला होता. एसटी कर्मचाऱ्यांना १५ एप्रिलपर्यंत अल्टीमेटम दिला आहे.१५ एप्रिलपर्यंत कामावर रुजू न झाल्यास एसटी महामडंळ कारवाई करु शकते.असं न्यायालयाने स्पष्ट केलं होत.

सर्वांना पुन्हा सामावून घ्या, त्यांनी आंदोलन सुरू केलं तेव्हा परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकून त्यांच्या जगण्याचे साधन हिरावून घेऊ नका, कामगारांना कामावरून न काढण्याविषयी न्यायालयाने महामंडळाला सूचना केली होती.

Tags:    

Similar News