राज्य सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव दिला असला तरी एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एकीकडे काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर दुसरीकडे अजूनही हजारो कर्मचारी संपावर आहेत. बीडमध्ये तर आता संपकरी कर्मचारी महिलांनी बस स्टँडवरच चूल पेटवून स्वयंपाक सुरु केला आहे. सरकार विलीनकरण करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशाराच या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.