Video: लाल परीची जागा काळी पिवळीने घेतली, काय आहेत प्रवाश्यांच्या भावना?

Update: 2021-11-10 16:13 GMT

सांगली: गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळं प्रवाश्याचं हाल होत आहे. प्रवाश्यांचे हाल होऊ नये म्हणून राज्य सरकारने परवानाधारक काळ्या पिवळ्या गाड्यांना एसटी स्थानकावर भाडेकरुंना घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे.

मात्र, लाल परीची जागा काळी पिवळ्या गाडीने घेतल्याने प्रवाशी नाराज झाले आहेत. जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, अपंग वंचित घटकांना स्वस्त दरात त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहोचवणाऱ्या लाल परीच्या कामगारांना अतिशय तुटपुंच्या वेतनावर काम करावे लागत आहे. त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत. यामुळे एस.टी.कामगारांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन सुरु आहे.

मात्र, या आंदोलनामुळे लोकांचे मोठे हाल होत आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजू सकटे यांनी घेतलेला आढावा.

Full View

Tags:    

Similar News