ST : दहा दिवसांत तब्बल २०० काेटींचा महसूल..‘लालपरी’ला दिवाळीत धनलाभ;

राज्यात एसटी हीच जीवनवाहिनी असल्याने गेल्या दहा दिवसांत प्रवासी वाहतुकीतून सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल एसटी महामंडळाने मिळवला आहे.

Update: 2023-11-14 10:00 GMT

गणेशोत्सव, नवरात्रीनंतर राज्य एसटी (ST) महामंडळाला दिवाळी (Diwali) महत्वाची ठरली आहे. राज्यात एसटी हीच जीवनवाहिनी असल्याने गेल्या दहा दिवसांत प्रवासी वाहतुकीतून सुमारे २०० कोटी रुपयांचा महसूल (revenue) एसटी महामंडळाने मिळवला आहे. धनत्रयाेदशीला (Dhantrayodashi) नगर विभागाला तब्बल एक काेटी ८ लाख ५८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे प्रवाशांसह महामंडळाचीही दिवाळी उत्साहात साजरी होत आहे.



 

र्षातील सर्वांत मोठा सण असलेल्या दिवाळीने बाजारात नवचैतन्य निर्माण केले आहे. शहरांसह गाव-खेड्यांमध्येही सणांचा आनंद ओसंडून वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या आयुष्यातून निवांत वेळ काढून आप्तस्वकीयांसह, कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने शहरवासी गावांकडे रवाना झाले आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि ५० टक्के तिकीट सवलतीची महिला सन्मान योजना यामुळे यंदा एसटीला उदंड प्रवासी लाभणार, असा अंदाज महामंडळाला होता. धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला हा अंदाज खरा ठरला. योग्य पद्धतीने केलेले गाड्यांचे नियोजन केल्यामुळे एसटीने महसूल मिळवला आहे, असे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, दिवाळीत एसटी महामंडळाची कोटीच्या कोटी उड्डाणं पहायला मिळतंय. दहा दिवसांत एसटी महामंडळाला सुमारे २०० कोटींचा महसूल मिळाला आहे. राज्यातील १४ विभागांमध्ये प्रत्येकी एक कोटीची कमाई झालीय आहे. मुंबई महानगरात ठाणे अव्वल ठरलंय. तर राज्यात पुण्याने बाजी मारल्याचं पहायला मिळतंय. सर्वात मोठ्या सणासाठी अनेक जण आपल्या गावी जात असतात, आणि प्रवासांसाठी नागरिक पहिली पसंती एसटी बसलाच देतात. १ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान एसटी महामंडळाने सुमारे २०० कोटींचा महसूल मिळवल्याने सामान्यांसह एसटीची महामंडळाची दिवाळी उत्साहात साजरी होतेय. एसटी महामंडळाने महिला सन्मान योजनेद्वारे ३८ कोटी १८ लाख, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना २७ कोटी २९ लाख, ज्येष्ठ नागरिक योजना ५ कोटी, सरकारकडून योजनांची प्रतिपूर्ती ७० कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.

Tags:    

Similar News