एसटी कर्मचाऱ्यांची संक्रात गोड...राज्य सरकारकडून ३०० कोटींचा निधी वितरीत...आजच पगार...
एसटी कर्मचाऱ्यांनी आपला नोव्हेंबर २०२२ मधील थकीत पगार मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दार ठोठावले होते. त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपिठाने एसटी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला खडे बोल सुनावले आणि तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ३०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली. आणि आता हे थकीत वेतन लवकरात लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा आता शुक्रवारी पगार होणार आहे. राज्य सरकारने याबाबत एक परिपत्रक काढून याची माहिती दिली आहे. तरतूद करण्यात आलेले ३०० कोटी रुपये महाराट्र राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर २०२२ च्या थकीत वेतन पोटी देण्यात येणार आहेत हे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान वेतन देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना पगार वेळेत मिळत नसल्यामुळे किमान वेतन मिळावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेश नुसार आता राज्यसरकारने नोव्हेंबर २०२२ मधील एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी ३०० कोटी रुपयांची राज्य सरकारने तरतूद केली आहे. आणि यापुढे प्रत्येक महिन्याच्या सात ते दहा तारखेपर्यत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल, असे निवदेन न्यायालयात राज्य सरकारकडून सादर करण्यात आले आहे. त्यामुळे सध्यातरी एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडावर हसू फुलले आहे. आणि यापुढे एसटी कर्मचाऱ्यांना उर्वरीत महिन्याच्या वेतनासह आगामी प्रत्येक महिन्याचे वेतन नेमून दिलेल्या तारखेच्या आत दिले जाईल अशी आशा आहे.